vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुढी पाडवा-मतदान वाढवा मतदानाचा टक्का वाढवुन उभारु लोकशाहीची गुढी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचा निर्धार

गुढी पाडवा-मतदान वाढवा मतदानाचा टक्का वाढवुन उभारु लोकशाहीची गुढी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचा निर्धार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. दरवर्षी नवीन वर्ष सुरु करतांना आपण सारेच संकल्प करतो. लोकशाहीची गुढी उंच उभारण्यासाठी मतदानातील लोकांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प करु या, असा निर्धार आज गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज ‘गुढी पाडवा- मतदान वाढवा’ या मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे जिल्हाभरात मतदार जनजागृतीचे उपक्रम सुरु करण्यात आले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

 

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विजय गवळी यांनी कीर्तनातून मतदानाचे महत्त्व सांगितले. तसेच देवगिरी महविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले.

 

पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी सांगितले की, गुढीपाडवा मतदान वाढवा ही चांगली संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जाणीव जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हे जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन केले.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, ‘स्वीप’ अंतर्गत जनजागृतीची मोहीम आखली गेली असुन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न होत आहेत. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन मतदानाच्या अधिकारबाबत जाणीव जागृती करावी व मतदानाचा अधिकार आपण सर्वांनी बजवावा.

 

मनपा आयुक्त जी.श्रीकांत म्हणाले की, गुढीपाडवा ह्या नववर्षानिमित्त आपण स्वतः मतदान करण्याचा व इतरांनाही मतदानासाठी आवाहन करण्याचा संकल्प करावा आणि तो पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावे, ती आपली सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी आहे. मतदान आपला हक्क आणि कर्तव्य आहे. शांत, निर्भय वातावरणात मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते,असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, ‘गुढीपाडवा मतदान वाढवा’, या उपक्रमात आजपासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेवून आपण मतदान वाढवणार आहोत. आजच्या दिवसाला ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदी असून मराठी नव वर्ष सुरू होत आहे. संकल्पना पुढे घेवुन मतदान जनजागृती करावी. येणाऱ्या काळात सर्व निवडणुकात मतदान करण्यासाठी व मतदार जागृती करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. पुढील पिढीला सदृढ लोकशाही बहाल करण्याची जबाबदारी आपण पार पाडावी. मतदान केंद्रावर सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नकारात्मक भूमिका दूर ठेवून मतदार जागृतीचे शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मतदानाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त खास , शेअर करुन महाराजांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर* 

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे वलवाडा परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली बचाव कार्य सुरू आहे 

चिमूर येथे सुरू होणार ‘विद्यार्थी सुविधा केंद्र’आमदार सुधाकर अडबाले यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशाची तात्काळ दखल