vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा…

 

राज्य प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपता जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पडला असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर दिग्गज नेते उपस्थित होते.

 

भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे.

 

 

भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर – पंतप्रधान मोदी

 

संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा असते. भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात आला आहे. जनतेला पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळेल. पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी संबोधन करताना सांगितलं आहे.

संबंधित पोस्ट

संविधान दिनानिमित्त “घर घर संविधान” दिंडीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मंदिरांसाठी कोणतंही आंदोलन करणार नाही वाराणसी काशी येथील,ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा देशात चांगलाच चर्चेत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

जिल्हा विकासाचा निधी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सर्वांची – पालकमंत्री अनिल पाटील आरोग्य यंत्रणांनी आपसातील समन्वयाने काम करावे

मुंबईमध्ये होणार पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल   – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

जलसंपदा विभागाचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पारितोषिक वितरण,महाराष्ट्र जलसमृद्ध करायचाय-डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta