vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संविधान दिनानिमित्त “घर घर संविधान” दिंडीचे आयोजन

संविधान दिनानिमित्त “घर घर संविधान” दिंडीचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी सातारा  : 26 नोव्हेंबर, संविधान दिनी संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सव वर्षात “घर घर संविधान” उपक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मुल्ये देशाच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहचावित यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 10 या कालावधीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, सातारा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नगरपरिषद समोर, सातारा या मार्गावर संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीची सुरूवात प्रतापसिंह हायस्कूल (राजवाडा), गांधी मैदान येथून राजपथ मार्गे तालीम संघ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, सातारा, कै. सौ. सत्यभामाबाई काळे, स्त्री शिक्षण मंदीर (कन्याशाळा), सातारा. व राजर्षि छत्रपती शाहू महाराज वसतिगृह सातारा येथील विद्यार्थी तसेच सामाजिक न्याय व विशेष विभाग अंतर्गत कार्यरत असणारी सर्व महामंडळे, बहुजन कल्याण विभाग, सातारा, जिल्हा जाती पडताळणी प्रमाणपत्र समिती, सातारा या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.

या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही, मी घातलेला खुट्टा जरांगेला उपटताच आला नाही; छगन भुजबळांच्या उपस्थितीत या साहित्यिकाचे वक्तव्य…

पोलीस शिपाई भरती कालावधीत वाहतूक मार्गात बदल

शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर रु. 5 तर दूध भुकटी निर्यातीस रु. 30 प्रति किलो प्रोत्साहन अनुदान

दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; शाळेने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत’ अशा पालक आणि बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया…

राष्ट्रवादी पार्टी चे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक…

vishwatmaklokswamivarta

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन