
सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
राज्य प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, असल्याची माहिती नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिली आहे. विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे खुप प्रयत्न केलेत. मात्र, त्यांना कुणीतरी फुस लावली आहे. विशाल पाटलांवर कारवाईसाठी प्रदेश काँग्रेसची 25 एप्रिलला बैठक होणार आहे. या बैठकीनंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला शिट्टी हे चिन्ह मिळालय. दरम्यान, विशाल पाटलांना चिन्ह मिळाल्यानंतर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर चोरदार टीका केली
नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर कारवाई करणार आहोत. कोणीतरी त्यांना फूस लावत आहे. 25 तारखेला आमची मिटींग आहे, त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सेक्युलर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहणार आहेत. त्याचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील.



