vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजमाजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे*निराधार वृद्धाच्या सेवे करिता मदतीचा हात दयावानंदू बाबा पालवे*सामूहिक सोहळ्यात 33 जोडपे विवाह बद्ध

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजमाजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे*निराधार वृद्धाच्या सेवे करिता मदतीचा हात दयावानंदू बाबा पालवे*सामूहिक सोहळ्यात 33 जोडपे विवाह बद्ध

 

 

राज्य प्रतिनिधी चिखली – ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेर घर (महिला आश्रम) लताई अनाथालंय भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा र. नं. Mh534 F11058/09 यांच्या वतीने विश्वरत्न विश्व शांती दूत तथागत भगवान बुद्ध जयंती व अहिल्याबाई होळकर जयंती वर महाराणा प्रताप यांच्या निमित्त सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा, बहुजन रत्न पुरस्कार सोहळा व फुले शाहू आंबेडकरी विचारावर व्याख्यान या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम चे उदघाट्क माजी मंत्री तथा आमदार सी राजा डॉ राजेंद्र शिगणे हे होते अध्यक्ष सेवा संकल्प चे नंदू बाबा पालवे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार राहुल बोन्द्रे, मंत्रालय सचिव विदयाधर महाले, हभप धर्म कीर्ती महाराज परभणी हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये सम्राट संघटनेचे आशिष बाबा खरात, माजी नगरसेवक डॉ राजू गवई, राका सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष दिलीप झोटे, काँग्रेस नेते डॉ सत्येंद्र भुसारी, शेतकरी नेते विनायक सरनाई, पत्रकार प्रताप मोरे, राका जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोन्द्रे, भाई प्रदिप अंभोरे, भाई विजय गवई, पंचशील बुद्ध विहार समिती अध्यक्ष विश्वनाथ काकडे, वीर पिता भारत पवार, युवा उद्योजक संतोष काळे पाटील,भरत जोगदंडे हे होते.

सामूहिक विवाह सोहळया च्या माध्यमातून शासना च्या कन्यादान योजनेचा लाभ सर्व गोरगरिबांनी घेतला पाहिजे असे मत माजी मंत्री तथा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.

हजार मनोरुग्णांना सांभाळणे सोपे आहे पण वयो वृद्धा ना सांभाळने फार जिगरीच काम आहे या पवित्र कामासाठी सर्वानी मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे मत सेवा संकल्प चे नंदू बाबा पालवे यांनी व्यक्त केले.

वृद्ध सेवे सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत कोणाकडून हि मदत न घेता भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे फार जिगरी चे काम आहे असे मत माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी व्यक्त केले.

समाजाचे ऋण फेडण्याचे खरे काम ऋणानुबंध समाज विकास संस्था करीत आहे या संस्थेच्या प्रत्येक कार्यात सर्व प्रकारे मदत करू असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले यांनी व्यक्त केले.

हभप धर्म कीर्ती महाराज यांनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सांगून उपस्थितीतांना मंत्र मुग्ध केले व वृद्ध सेवे सोबतच समाज सेवा करणारे खूप महान असतात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्थेच्या वतीने बहुजन रत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यभरातून सामाजिक, राजकीय, साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम चे सूत्रसंचालन दयानंद निकाळजे यांनी तर प्रास्ताविक आयोजक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ सुभाष राऊत यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीते साठी संबोधी ग्रुप चे अध्यक्ष एस एस गवई, इंजि एन के सरदार, विरसेन साळवे, सुमेध जाधव, सिद्धार्थ वाकोडे, संदीप वाकोडे, घेवंदे, सातगाव भुसारी उपसरपंच राजू मोरे, शंकर जुमडे, समता सैनिक दलाच्या अध्यक्षा आशाताई कांबळे, सीमा वाकोडे, वनिता वाकोडे, मंदा कासारे, छाया मलवार, प्रेमराज वाकोडे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक…

vishwatmaklokswamivarta

ब्रेकिंग न्यूज:नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग; आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 6 जण दगावल्याची भीती, बचावकार्य सुरूच

vishwatmaklokswamivarta

एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मालेगाव केस कमकुवत करू पाहात असल्याचा आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केला

vishwatmaklokswamivarta

दारुची दुकानं, बार उघडता पण मंदिर नाही सरकारची ही भूमिका महाराष्ट्रात हिंदू मनाला न पटणारीमं दिरांसाठी भाजपा आक्रमक, 

vishwatmaklokswamivarta

अधिक पारदर्शकतेने ग्राहकांना सेवा द्याव्यात- अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे,स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार…

vishwatmaklokswamivarta

जिवायो निधी खर्चाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta