vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिवायो निधी खर्चाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिवायो निधी खर्चाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यास निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता, अपेक्षित कालावधी कमी मिळेल. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन करुन निधी वेळेत खर्च करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या खर्चाचा आढावा आज नियोजन सभागृहात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सहायक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना अंतर्गत प्राप्त, प्रशासकीय मान्यता प्राप्त व यंत्रणांना वितरीत निधीबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी म्हणाले की, निधी खर्चाबाबत प्रक्रिया राबवून निधी शिल्लक रहात असेल तर निधी समायोजनासाठी लवकरात लवकर माहिती पाठवावी. जेणे करुन निधी अन्य विभागांच्या मागणीनुसार वर्ग करता येईल. निवडणूक आचार संहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता, निधी वेळेत खर्चून कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे नियोजन करा,असे निर्देशही श्री. स्वामी यांनी दिले.

संबंधित पोस्ट

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुधाकर अडबाले,विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपुरात धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्यक्रमास आपणासह सर्व जालनेकर निमंत्रीत!फेस्टिवलचे संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन-राजेंंद्र गोरे

vishwatmaklokswamivarta