
कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):- कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि व्यवसाय प्रशिक्षण सहसंचालक यांच्या कार्यालयांमध्ये साफसफाई, वाहन चालक, शिपाई इ. पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नेमणूका करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून दि.१७ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत,असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता एस. आर. वराडे यांनी कळविले आहे.
सहसंचालक, व्यवसाय व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात साफसफाईचे २ पद ६ महिन्यासाठी, उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात वाहन चालकचे १ पद व शिपाईचे १ पद ६ महिन्यासाठी तर सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामध्ये शिपाईचे १ पद ६ महिन्यासाठी करारनामा पद्धतीने कंत्राटी तत्वावर सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी सोसायट्यांकडून भरण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवार दि.१७ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
कार्यरत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी यांनी खालील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१. तालुका उपनिबंधक / सहायक निबंधक, सहकारी संस्था, (सर्व तालुके छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
यांनी कळविलेल्या कार्यरत संस्थांच्या यादीत संस्थेचे नाव समाविष्ट असावे.
२. साफसफाई कामकाज करणाऱ्या सोसायटीचा उद्देश उपविधीमध्ये नमुद असला पाहीजे.
३. सन २०२२-२३/२०२३-२४ या दोन वर्षाचे संस्थेचे लेखा परिक्षण केलेले पाहीजे.
४. संस्थांनी यापुर्वी काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडावे (असल्यास)
५. सर्व सदस्य क्रियाशिल असल्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र.
६.साफसफाई पदासाठी पात्रता:- अ.उमेदवाराचे शिक्षण १० वी पास / नापास असावे.
ब. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे असावे. (पदविधर अंशकालीन उमेदवारास वय ५५ पर्यंत शिथिलक्षम)
क.उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभुमीचा किंवा प्रवृत्तीचा नसावा.
७.वाहन चालक पदासाठी पात्रताः-
अ.उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
ब.उमेदवार १० वी १२ वी उतीर्ण असावा.
क.उमेदवाराचे वय १८ ते ४०वर्ष असावे व तो निर्व्यसनी असावा.
ड.उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा (LMV) अघावत/नुतनीकरण केलेला परवाना असावा.
इ.उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभुमीचा किंवा प्रवृत्तीचा नसावा.८. शिपाई पदासाठी पात्रताः-
अ.उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावा.
ब.उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे व तो निर्व्यसनी असावा.
क.उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभुमीचा किंवा प्रवृत्तीचा नसावा.
वरील अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या इच्छूक कार्यरत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी सोसायट्यांनी शुक्रवार दि.१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा,बस स्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसहीत अर्ज करावे.
०००००



