vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण-भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

राज्य प्रतिनिधी-केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयांमार्फत आज देशभरात 40 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले. या माध्यमातून देशभरातील सुमारे 51 हजार तरूणांना आज नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला व संबोधित केले.

याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर येथे स्थानिक पातळीवर हा कार्यक्रम संपन्न झाला. यंदाच्या रोजगार मेळाव्याची जबाबदारी भारतीय टपाल विभागाकडे सोपवण्यात आली होती. याअंतर्गत राज्यातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मुंबई येथील 80, पुणे येथील 103 तर नागपूर येथील 113 उमेदवारांचा समावेश आहे.

नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकूण 113 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. श्री. गडकरी यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुण्यात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय नागरी उड्डाण तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भूषवले. याप्रसंगी भारतीय टपाल सेवेचे पुणे विभाग संचालक अभिजित बनसोडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या टपाल विभागासह भारतीय रेल्वे, सीमा सुरक्षा बल, सीजीएसटी आणि कस्टम, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल, भारतीय विमानतळ प्राधीकरण, केंद्रीय राखीव पोलीस बल तसेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आदी विभागांमधील तब्बल 103 उमेदवारांना मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

देशात तरूणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तरूण पिढी ही आपल्या देशाची ताकद असून त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत आहे, असे प्रतिपादन मुरलीधर मोहोळ यांनी केले.

मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योजकता आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह उपस्थित होते.

हा दिवस आपल्या नियुक्त झालेल्या उमेदवारांसह देशासाठीही महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. आज जग आव्हानात्मक काळातून जात आहे, अशा काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये सुरू केलेल्या रोजगार मेळा सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, नियुक्त झालेल्या युवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देत, रोजगाराचे साधन निर्माण केले असल्याचे श्री. शेलार म्हणाले.

संबंधित पोस्ट

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी,नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात …

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प”-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर· जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र· दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta