vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदर्श माता सखुबाई साबळे यांचा आळेफाटा येथे सहस्रचंद्र दर्शन सोहळा..

आदर्श माता सखुबाई साबळे यांचा आळेफाटा येथे सहस्रचंद्र दर्शन सोहळा..

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई प्रतिनिधी

आळेफाटा- स्वर्गीय मच्छिंद्रनाथ म्हसुजी साबळे यांच्या पत्नी आणि डॉ. दिगंबर साबळे,सुहास साबळे यांच्या मातोश्री आदर्श माता श्रीमती सखुबाई मच्छिंद्रनाथ साबळे यांचा सहस्रचंद्र दर्शन अभिष्टचिंतन सोहळा आळेफाटा येथील साईलीला मंगल कार्यालयात येत्या रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

 त्यांच्या या सोहळ्यानिमित्त संगीत विशारद समाज प्रबोधनकार ह.भ.प.अनिताताई रावसाहेब जाधव यांचे सायंकाळी ४ ते ५.३० या दरम्यान कीर्तन होणार आहे. याप्रसंगी ह.भ.प. गणेश महाराज शिंदे, ह.भ.प. गुलाब महाराज खालकर, ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार शरद दादा सोनवणे, जि.प. सदस्या आशाताई बुचके,माजी जि. प. सदस्य नेताजी दादा डोके, प्रसन्ना अण्णा डोके, नयनाताई डोके, दिव्यांग सेवा केंद्र, पुणे आयुक्त ओम प्रकाश देशमुख- (आयएएस), पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ (गुन्हे अन्वेषण- पुणे) , कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मुंबईचे निवृत्त सहाय्यक आयुक्त विश्वपाल भुजबळ, उद्योजक – समाज कार्यकर्ते मोहन पाटील भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात दुपारी ३ वा.सत्कारमूर्तींचे आगमन व स्वागत, ३.३० ते ४ वा. पाद्य पूजन, ४ वा. कीर्तन, ५ वा. सत्कारमूर्तींचा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. आज आमची आई सखुबाई यांचे वय ८२ असले तरी अजूनही ती मनाने तरुण आहे. तिचा काम करण्याचा उत्साह, स्फूर्ती अद्याप टिकून आहे. राधाबाई, सुनंदाबाई, मिनाबाई, सुनीताबाई, दिगंबर आणि सुहास अशा आमच्या सर्व भांवंडांचा मातोश्रीने उत्तम पद्धतीने सांभाळ करून आम्हाला चांगले शिक्षण दिले, अशी कृतज्ञता डॉ. दिगंबर साबळे, सुहास साबळे यांनी आईच्या या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त व्यक्त केली. — असे म्हटले जाते की “शिकलेली आई घर पुढे नेई” या सुविचारा प्रमाणे येथे इयत्ता पहिली देखील न शिकलेल्या आमच्या आईने जिद्द,मेहनत, कर्तव्यनिष्ठता, उच्च आचार विचार आणि संस्काराने आमचे घर पुढे नेले. यातच आमच्या आईचे मोठेपण सामावलेले आहे, असेही डॉ.दिगंबर साबळे, सुहास साबळे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आमची आई धीर गंभीर स्वभावाची होती. तेवढीच ती प्रेमळ, कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेणारी आहे. आम्हा सर्व भावंडांचा पहिला गुरु, शिक्षक आणि देव देखील आमची आईच आहे. तिच्याच मार्गदर्शनाने आणि तिने उपसलेल्या कष्टामुळेच आज आम्ही सर्व भावंडे सुखद अनुभव आयुष्यभर अनुभवत आहोत असेही साबळे बंधूंनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम आझाद मैदानावर

vishwatmaklokswamivarta

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे शेतकरी पत्नीच्या बाळंतपणातील मृत्यूसाठी मिळणार दोन लाखांची मदत..

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta

मिशन शक्ती” या योजनेच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह“सखी निवास” करीता प्रस्ताव मागवले.

vishwatmaklokswamivarta

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta