vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

 

 

 

रायगड जिमाका प्रतिनिधी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या.तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. याबरोबरच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

 

जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.

 

नागरिकांनी काळजी घ्यावी, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये. मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

000000

संबंधित पोस्ट

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा“जैविक इंडिया ॲवार्ड 2023” पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

वाचन प्रेरणा दिनानिमित्त बुधवारी ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta