
वाघांच्या संवर्धनाबाबत आज जगभरात साजरा होत आहे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’
राज्य प्रतिनिधी
जगभरात ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’ साजरा केला जातो. वाघांच्या घटत्या संख्येची कारणे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात आहे
2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट दरम्यान हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह (GTI) द्वारे करण्यात आले होते. या परिषदेत जगभरातील सुमारे 13 देश सहभागी झाले होते. व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेताना या सर्व देशांनी वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर आतापर्यंत इतर अनेक देशांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
वाघांच्या घटत्या संख्येची कारणे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आपली परिसंस्था निरोगी ठेवण्यात आणि तिची विविधता टिकवून ठेवण्यात वाघ महत्त्वाची भूमिका बजावतात. आजचा हा दिवस वाघांची शिकार, त्यांचा अधिवास नष्ट होणे आणि त्यांचे रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून सदर दिवस 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित केलेला आहे
वाघांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला. या प्रकल्पांतर्गत अनेक व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले. वाघांची शिकार थांबवून त्यांची संख्या वाढवण्याचे काम करता यावे यासाठी अनेक प्रकारची धोरणे आखण्यात आली. त्यामुळे भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प सुरु आहेत. मात्र तरीही गेल्या पाच वर्षांत भारतामध्ये 600 हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे.



