vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिका आणि रोटरीक्लबच्या माध्यमातून महानगरपालिकेच्याप्रथम वर्धापन दिनानिमित्त महास्वच्छता अभियान सामाजिक संघटनांसोबत महास्वच्छता अभियान ही एक सकारात्मक सुरूवात- मनपा आयुक्‍त

जालना शहर महानगरपालिका आणि रोटरीक्लबच्या माध्यमातून महानगरपालिकेच्याप्रथम वर्धापन दिनानिमित्त महास्वच्छता अभियान सामाजिक संघटनांसोबत महास्वच्छता अभियान ही एक सकारात्मक सुरूवात- मनपा आयुक्‍त

 

 

 

जालना शहर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ जालना आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांसोबत जालना शहर महानगरपालिकेच्‍या प्रथम वर्धापन दिनानिमित्‍त शहरात महास्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले. सदरचे ०८ दिवसीय राबविले जाणारे महास्‍वच्‍छता अभियान म्हणजे एक सकारात्मक सुरूवात असून यापुढेही आपल्या जालना शहराला एक स्वच्छ महानगर म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या अभियानात स्वच्छ केला जाणारा परिसर पुन्हा अस्वच्छ होणार नाही, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले.

 

जालना शहर महानगर पालिकेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज बुधवार दि. ०७ ऑगस्ट रोजी ०७ ते १४ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ शहरातील अग्रसेन चौक येथे श्री. खांडेकर यांच्या हस्ते आणि महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड, रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, प्रकल्प प्रमुख सुरेंद्र पित्ती, सौ वर्षा पित्ती, रोटरी क्लब जालनाचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडिया, सचिव रवी भक्कड, कोषाध्यक्ष महेंद्र बागडी, कुंडलिका सीना पुनरूज्जीवन अभियानचे सुनीलभाई रायठठ्ठा, उदय शिंदे, उद्योजक अरुण अग्रवाल महापालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार आणि विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

 

यावेळी मा. आयुक्‍त यांनी संबोधित केले की, जालना शहर महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिन, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ०७ ते १४ ऑगस्टदरम्यान शहरातील विविध वार्डात रोज सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. महास्वच्छता अभियान राबण्यासाठी नोडल अधिकार्‍यांसह सहकर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्यात. त्यासाठी वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज ०७.०८.२०२४ रोजी भोकरदन नाका ते भास्करराव दानवे यांचे घर, भोकरदन नाका ते राजुरी कॉर्नर व्हाया मुंडे चौक, भोकरदन नाका ते विशाल कॉर्नरदरम्यान स्‍वच्‍छता करण्‍यात आली.

 

शहर स्वच्छतेसाठी आमचे पुरेपूर प्रयत्न आहेच. आता रोटरीसारख्या विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता केली जाणार आहे. अशा संघटनांच्या सहकार्याने निश्चितच कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकपर भाषणात रोटरीचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडिया यांनी यापुढेही स्वच्छतेच्या कार्यासाठी क्लबचे सदैव सहकार्य राहील,

[07/08, 8:58 pm] Swamiji: दिली.

 

प्रारंभी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणाऱ्या विभागात शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. क्रेडाई जालनाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, डॉ. विठ्ठल पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. स्वच्छता रथ, संबळ पथक, पथनाट्य हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कलापथकाने विविध विषयावर गीताच्या माध्यमातून जनजागृती केली. स्वच्छता, ओला कचरा, सुका कचरा, झाडे लावा, झाडे जगवा, वायु प्रदुषण कमी करणे, कचरा कमी करणे, कचर्‍यापासुन पुनर्वापर करणे, टाकावूपासून टीकावू वस्तू तयार करणे, नळाला तोटी लावणे, पाण्याची काळजी कशी घ्यावी, नालीत कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकणे आदी विषयावर जनजागृती करण्यात आली. हवेत तिरंगी फुगे सोडून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी जालना शहर महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रकल्प सुरेंद्र पित्ती यांनी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

 

याप्रसंगी महापालिकेचे अधिकारी केशव कानपुडे, कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, रोटरी क्लब ऑफ जालना चे सुरेश मगरे, डॉ. विजय जेथलिया, डॉ. धरमचंद गादिया, अरुण मोहता, विनोद मोतीवाला, अंबेश बियाणी, बजरंग भक्कड, प्रसाद राव, शिवरताना मुंदडा, राजेश बजाज, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, हेमंतभाई ठक्कर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा जयश्री लड्डा, रोटरी इलाईटचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, सचिव अनया अग्रवाल, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष सागर दक्षिणी, सचिव गौरव मोदी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. अभय सोनी, रोटरी रेणुबोचे अध्यक्ष महेश माळी, सृष्टी फाउंडेशनच्या डॉ. प्रतिभा श्रीपत, रेनिल फाउंडेशनचे प्रतीक गावडे, राजेभाऊ मगर, जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, विष्णू पाटेकर, पर्यावरण प्रकृती विभागाचे आशिष पाठक, कुणाल तांबट, अच्युत मोरे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, लिपीक वर्ग व अधिनस्‍त शिपाई आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठवडाभर चालणा-या स्‍वच्‍छता महाअभियानात शहरातील नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व जालना शहर स्‍वच्‍छ शहर म्‍हणुन ओळख मिळवुन देण्‍यास हातभार लावावा असे आवाहन या प्रसंगी मनपा आयुक्‍त श्री. संतोष खांडेकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*

मतदार जागृतीसाठी विवियाना मॉल येथे आयोजित कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचाआनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला..

स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषीत