vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामोद्योग भरारी’ पुरस्कार जाहीर 13 ऑगस्टला मुंबईत वितरण

ग्रामोद्योग भरारी’ पुरस्कार जाहीर 13 ऑगस्टला मुंबईत वितरण..

 

            मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती, मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली.

 

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हे विविध रोजगार निर्मितीच्या योजना राबवून राज्यभर ग्रामीण उद्योजक निर्माण करीत आहे. मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळामार्फत ग्रामोद्योग भरारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना, द्वितीय पुरस्कार पुणे येथील प्रमोद रोमन यांना तर तृतीय पुरस्कार गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे सन्मानचिन्ह आणि रक्कम रूपये 15 हजार, 10 हजार आणि पाच हजार असे आहे. या बरोबरच ठाणे येथील सुजाता पवार, अमरावतीच्या उज्ज्वला चंदन आणि नांदेड येथील बालाजी काजलवाड यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 

या पुरस्कारांचे वितरण विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 

000

संबंधित पोस्ट

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावलेमहाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन…

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका

मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर; पहा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

बोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा.

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू