vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कास्ट्राईब चे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन चव्हाण, गोरंट्याल यांच्या भेटी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

कास्ट्राईब चे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन

चव्हाण, गोरंट्याल यांच्या भेटी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

 

जालना (प्रतिनिधी) : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे, या सह विविध मागण्यांबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोद भगत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ( ता.13) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

सकाळी 11 वा. धरणे आंदोलनास प्रारंभ झाला. माजी आ. अरविंदराव चव्हाण, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद भगत, जिल्हा सरचिटणीस विलास कोमटवार, राजेश सदावर्ते ,पंजाब खिल्लारे , राजेंद्र शिंदे, रवींद्र मगरे, संजय चव्हाण ,सनी कटकम, गजानन मगर ,अनिल भेरे,

गोविंद इंगळे, नितीन श्रीमंगले, आबेद कुरेशी, राजू पवार ,राम पवार ,रंजना मालेवाड, मीना जाधव ,रेणुका बोधुल, राहुल लालझरे ,रामेश्वर कुबेर ,सचिन साळवे, अनिल एडके, रामेश्वर जावळे, प्रदीप पाचपोहे ,मुकुंद महाजन, पारस अहम महिंद्रकर ,एस.जी.आडणे, रमेश पैठणकर, ए.पी.दांडगे, श्रीराम कोकाटे, नरेंद्र जोशी ,पी.आर.गायकवाड, संजय सिंगल, मोहन कदम ,एस.डी.सोनवणे, मंगेश देशपांडे ,आशा आढाव, गणेश पोटे ,संगीता फुलारी, आर. जे. चव्हाण, एस. एस. दाणेकर ,डि.एन.खलसे, एम.पी .जाधव, ए. आर. जाधव ,एस.पी .बाविस्कर ,एस.एस. अंभुरे, व्ही. एस .घनवटे ,एम.एस .घुले, एस .एस.पारवे ,एम .आर .जाधव, पी. एम .उल्लेवाड ,जी.एस.मगर, आदींनी सहभाग नोंदवला.

यावेळी कर्मचाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघटनेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले.

सामान्य प्रशासन विभागाने दि. 07 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अडथळा निर्माण केला असून भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती ,जमाती, इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सरळ सेवा भरती मध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश दिलेले असतांनाही महाराष्ट्र शासनाने अद्याप पदोन्नती बाबत निर्णय घेतला नाही. आरक्षणाची रिक्त पदे न भरणे हे संविधान विरोधी असून राज्यात कंत्राटी भरती धोरण अमलात आणल्यामुळे लाखो बेरोजगारांमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण झाला आहे .असे नमूद करत

कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करून सरळ सेवा भरती मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला .

__________

संबंधित पोस्ट

मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी..

तेलंगणात सुरक्षा वाढ, आमदारांना हलवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये बसेसची व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध 1650 तक्रारी प्राप्त ;654 परवानाधारकांचे परवाने निलंबित

vishwatmaklokswamivarta

*”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया ..

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते १ डिसेंबर रोजी उदघाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

vishwatmaklokswamivarta