
विना अनुदानित खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी एकविध संघटना पदाधिकाऱ्यांची आज बैठक
सांगली, प्रतिनिधी : विना अनुदानित क्रीडा प्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केली आहे. या खेळ प्रकारांशी संबंधित जिल्हास्तरीय एक विध खेळ संघटनांच्या अध्यक्ष किंवा सचिव यांनी बैठकीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सांगली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या वर्षी क्रीडा संचालनालयाच्या निर्देशानुसार एकूण 93 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये 49 अनुदानित व 44 विनाअनुदानित क्रीडा प्रकार आहेत. विना अनुदानित क्रीडा प्रकारामध्ये आष्टे-डु-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रीकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रीकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअर बॉल, थायबॉक्सिंग, रोप स्किपींग, हाप किडो बॉक्सिंग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट्स, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पावर लिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टारगेटबॉल, टेनिस क्रीकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंट्याक्यू, लंगडी, जंप रोप, स्पोर्ट्स डान्स, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रीकेट या खेळांचा समावेश आहे.
या खेळांची नियमावली, तांत्रिक बाबींची माहिती संघटनांच्या पदाधिकारी यांच्याकडून करून क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000



