vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडीशिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न..

शिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडीशिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न..

 

जालना, (प्रतिनिधी)- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यामहिला आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जालना शहरातील शिवसेना भवनात स्त्रीशक्ती संवाद’ मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्यासंजना घाडी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, पक्ष निरीक्षक प्रियंका घाणेकर व सोनम जामसुदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले

होते. यावेळी जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, परतुर, घनसावंगी

विधानसभा मतदार संघांतील महिला पदाधिकार्‍यांचा आढावा घेतला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,

उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, तालुकाप्रमुख

हरिहर शिंदे, वैâलास पुंगळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर,

सुमनताई घुगे, गंगुताई वानखेडे, आयोध्या चव्हाण, शितल गव्हाड, मंजुषा

घायाळ, शोभा पुंगळे, पुजा टेहरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना उपनेत्या संजना

घाडी म्हणाल्या की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिलांचा

प्रचंड आदर सन्मान करणारा पक्ष आहे. महिलांनी मोठ्या संख्येने

जिल्ह्यातील संघटन मजबुत करावे. एकुण मतदार संख्येत महिलांची संख्या ही

निम्मी आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांचे संघटनही बळकट असणे

गरजेचे आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा

मुख्यमंत्रीपदी बसवयाचे आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागणे

गरजेचे आहे. राज्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते

अत्याचार याचा उल्लेख करुन त्यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधार्‍यांचा

खरपूस समाचार घेतला. आगामी सर्वच निवडणुकांत फुटीर व गद्दारांना धडा

शिकवावा, असे आवाहन केले.

यावेळी पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

म्हणाले की, आपल्या घरदार व कुटूंबांची जबाबदारी सांभाळून महिला भगिनी

शिवसेना पक्षात मोठ्या हिरीरीने काम करतात. पक्षानेही आतापर्यंत अनेक

वेळा त्यांना वेगवेगळ्या पदावर बसून सन्मान केला. आगामी काळात होणार्‍या

सर्वच निवडणुकांत महिलांना मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे.

यामुळे महिलांनी शिवसेना पक्षात काम करावे, पक्ष संघटन वाढवावे, असे

सांगून त्यांनी उपस्थित पदाधिकारी महिलांचा गौरवपुर्ण उल्लेख केला.

शिवसेना पक्ष हा सामान्य, वंचित घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. महिलांनी

आपले संघटन वाढवून गावा-गावात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या

शाखा सुरु कराव्यात, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबेकरांनी केले.

याच कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनीही महिलांशी

संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे कौतुक केले. यावेळी

शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, माजी नगरसेविका

मिनाताई घुगे, रोहिणी तोगे, शिला शहाने, बेबीताई पावसे, योगिता शिंदे,

शितल मुरकुटे, आरती काळे, गयाबाई पवार, कुंतीका भुसारे, लता वेलदोडे,

रुख्मिनी घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने जालना, बदनापूर, भोकरदन,

जाफराबाद, मंठा, परतुर, अंबड, घनसावंगी तालुक्यातून महिला पदाधिकारी

उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा महिला संघटक मंगल मेटकर

यांनी केले.

संबंधित पोस्ट

रत्नागिरी राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये, माती परीक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध लोकशाहीच्या राज्यात आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल, तर पोलिसांना शरम वाटली पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल

एक दिवस सैनिकांसाठी’अभियान राबविणार    -जिल्हाधिकारी आशिष येरेकर-सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न.

हाफिज अब्दुल अजीम यांची जमिअत उल्मा अर्शद मदनी औरंगाबाद शहराचे पाचव्यांदा अध्यक्षपदी निवड मौलाना कैसर खान बैती तिसऱ्यांदा सचिव पदी नियुक्त…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल..