
परभणीत धक्कादायक घटना पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार…
राज्य प्रतिनिधी
बदलापूर येथे झालेली लहान मुलीवरील दुर्दैवी घटना ताजी असताना पुन्हा अशा प्रकारे महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना परभणीत समोर येत आहे पाच वर्षाच्या. इंग्रजी शाळेत बालवाडीत शिकणा-या चिरमुडीवर अत्याचार झाला आहे. शाळेतील स्वच्छतागृहातच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर अनेक सामाजिक घटनेचा जाहीर विरोध नोंदविला आहे
याबाबतची सविस्तर माहिती अशी की परभणी सेलू परिसरातील पाच वर्षाच्या चिरमुडी वर शाळेतील स्वच्छतागृहातच अज्ञात इसमाद्वारे अत्याचार करण्यात आले होते यामुळे ती घरी येतात याबाबतची सर्व हकीकत तिने आपल्या आईला सांगितले
मुलीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे…अल्पवयीन मुलगी इंग्लीश स्कूलमध्ये बालवाडीला शिकत आहे. 5 ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आल्यानंतर मुलीला सरळबसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पिडितेच्या अंगावर ओरखडे दिसून आल्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आलंय.. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलंय..
या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात पोक्सो सह इतर कलमाखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.



