vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त नागरिकांना विशिष्ट वेळेत भेटता येणार

मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त-नागरिकांना विशिष्ट वेळेत भेटता येणार..

 

राज्य प्रतिनिधी- मा.भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, दोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी सत्यप्रकाश टी. एल. (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१६९६४०२ आणि ई-मेल आयडी dharavisionkoliwadagenobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

वडाळा व माहिम या मतदार संघासाठी हिमांशू गुप्ता (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ८९२८७९३६०१ आणि ई-मेल आयडी wadalamahimgenobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

वरळी व शिवडी या मतदार संघासाठी समीर वर्मा (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१३८१८३२ आणि ई-मेल आयडी worlishivadigenobserver@gmail.com हा आहे. नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

भायखळा व मलबार हिल या मतदार संघासाठी अंजना एम.(भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७२५४३ आणि ई-मेल आयडी bycullamalabarhillgenobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबादेवी व कुलाबा या मतदार संघासाठी शिल्पा शिंदे (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७८१८३ आणि ई-मेल आयडी mumbadevicolabagenobserver@gmail.com हा आहे. यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ असणार वाजेपर्यंत आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण एलवीन गेस्ट हाऊस, हेन्री रोड, अपोलो बंदर, मुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१७४३२६८ आणि ई-मेल आयडी observerpolicemumbaicity@gmail.com हा आहे. नागरिकांनी भेटण्याची वेळ दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा,वडाळा, माहिम, वरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता (भारतीय राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४००२१६ आणि ई-मेल आयडी exp178to182@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित (भारतीय राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४७४०७३ आणि ई-मेल आयडी exp183to187@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करतील. केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा– सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील. केंद्रीय खर्च निरीक्षक उमेदवारांच्या खर्चाची तपासणीबाबत कामकाज पाहणार आहेत.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना, आरोपीकडून डायरी जप्त

vishwatmaklokswamivarta

भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री