vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आक्षेपार्ह विधानाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आक्षेपार्ह विधानाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

 

राज्य प्रतिनिधी-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता १५ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता. करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना देण्यात आली होती. याबाबत धनंजय महडिक यांनी खुलासा सादर केला. याबाबत सादर केलेला खुलासा अमान्य करीत खासदार श्री. महडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२३ वा जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

चौथ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा

दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही!

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

जालन्यात ब्राह्मण समाजाच्या उपोषणास जयभीमसेनेचा पाठींबा…

vishwatmaklokswamivarta

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ उभारावे-उपमुख्यमंत्री…

vishwatmaklokswamivarta