vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

  • गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

 

मुंबई प्रतिनिधी: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्यात. मुंबई, सातारा पाठोपाठ आता त्यांना अकोल्याची जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर अकोटमध्ये गुन्हा दाखल झालाय.

 

आधीच सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात दरम्यान सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात आज अधिकृत आदेश निघणार आहेत.

 

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून पैसे उकळल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील आणि अजयकुमार बहादूरसिंह गुजर यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एसटी महामंडळात गेल्या 5 महिन्यांपासून बेकायदा संप सुरु आहे. या प्रक्रियेदरम्यान कर्मचारी आणि पदाधिकारी वेगवेगळ्या लोकांमार्फत कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करुन त्यांची फसवणूक करत आहेत. मागील संप आणि पगार न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडल्याचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

 

 

अजयकुमार बहादूरसिंह गुजर हे औरंगाबाद आगार क्रमांक 01 येथे मुख्य कारागीर असून कनिष्ठ वेतन एसटी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटनेने बेकायदेशीर पद्धतीने एसटी महामंडळात संपाची नोटीस देऊन संप सुरु केला होता, असा आरोप करण्यात तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

महाड दुर्घटनेमध्ये 11कामगारांचा मृत्यू,मृतांची ओळख पटविण्याची प्रशासनाची कार्यवाही पूर्ण 

vishwatmaklokswamivarta

दोन अधिकाऱ्यांचे स्टेट आणि झेडपी समाजकल्याणमध्ये दहा वर्षांपासून ठाण!भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केली मुख्यमंर्त्यांकडे तक्रार : बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी..

vishwatmaklokswamivarta

शहापूरमधील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्क यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत,जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता..

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणीभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…