vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणीभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणीभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

 

 

 

            राज्य प्रतिनिधी सांगली, मिरज, कुपवाड या ठिकाणी दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकूण 24 हायस्कूल / महाविद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दि. 25 ऑगस्ट 2024 रोजीचे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

 

परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.

 

ही परीक्षा (१) सिटी हायस्कूल गावभाग सांगली, (२) वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिरिंग विश्रामबाग, सांगली, (३) श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, दक्षिण शिवाजी नगर, गुलमोहर कॉलनी, सांगली, (४) संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट टिळकनगर, वानलेसवाडी मिरज, (५) डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, (६) सांगली हायस्कूल सांगली, आमराईजवळ, महावीरनगर, सांगली, (७) मोहम्मदिया ॲग्लो उर्दू उच्च विद्यालय व कला व विज्ञान शालेय कनिष्ठ महाविद्यालय, सांगली, (८) श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली, (९) विलिंग्डन कॉलेज सांगली, (१०) राणी सरस्वती देवी कन्या स्कूल, तानाजी चौक, सांगली (११) श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली, (१२) श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल, सांगली, (१३) सौ. लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय, सांगलीवाडी, सांगली, (१४) जी.ए. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, हरभट रोड, सांगली, (१५) चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, विश्रामबाग, सांगली, (१६) गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, उत्तर शिवाजी नगर, सांगली, (१७) मातोश्री गंगामा शिवाजी कोठारी गुजराथी विद्यालय आणि ज्यू कॉलेज, महावीरनगर, सांगली, (१८) प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळा, विश्रामबाग, सांगली, (१९) सौ. के. बी. दामाणी हायस्कूल, चांदणी चौकाजवळ, सांगली, (२०) सांगली हायस्कूल व श्री विनोद शिवाजी भाटे आर्टस, सायन्स व कॉमर्स ज्यु. कॉलेज, महावीरनगर, आमराईजवळ, सांगली, (२१) मातोश्री सायराबाई चंपालाल बेथमुथाज्यु कॉलेज, रिसाला रोड, खणभाग, सांगली (२२) श्रीमती राजमती नेंमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गणपती मंदिर रोड, चिनार हॉटेल जवळ, नेमिनाथनगर, सांगली, (२३) कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला, गणेशदुर्ग राजवाडा, सांगली, (२४) हि.हा.रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, गणेशदुर्ग, राजवाडा, सांगली

 

हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत

संबंधित पोस्ट

कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

vishwatmaklokswamivarta

सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर-31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात मोठा स्फोट, 4 महिलांचा जागीच मृत्यू, 2 जखमी..

एक दिवस सैनिकांसाठी’अभियान राबविणार    -जिल्हाधिकारी आशिष येरेकर-सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta