vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर-31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर-31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी:- राज्याच्या परिवहन आयुक्तांनी महाराष्ट्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट – HSRP) बसविणे बंधनकारक करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून वाहन चालकांनी 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने कल्याण उप प्रादेशिक कार्यालयासाठी मे. रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क निर्धारित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.

राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना HSRP नंबरप्लेट सक्तीची केली असून वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अॅल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.

हाय सिक्यूरिटी नंबरप्लेटचे महत्व लक्षात घेता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून त्याकरीता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून ही नंबरप्लेट बसवून घेता येईल. त्यासाठी दुचाकी आणि ट्रॅक्टर: रु.450/- (जीएसटी वगळून), तीन चाकी: रु.500/- (जीएसटी वगळून), हलकी मोटार वाहने/ पॅसेंजर कार/ मिडियम कमर्शियल वाहन/ अवजड कमर्शियल वाहन आणि ट्रेलर/ कॉम्बिनेशन: रु.745/- (जीएसटी वगळून) हे शुल्क निर्धारित केले आहे.

नियुक्त केलेली एजन्सी आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रँचायझी सुरु करुन वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. याबाबतची माहिती व निर्देश एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक लवकरच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने दि.31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावून मिळणार आहे, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.बारकुल यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

थोरियम अणुभट्टी विकासासाठी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार..

 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बदलापूर-अंबरनाथ दरम्यान इंजिनात बिघाड..

मतदान अधिकाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण972 मतदान केंद्रासाठी 1084 पथके

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

vishwatmaklokswamivarta