vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

ठाणे, प्रतिनिधी :- शहापूर तालुक्यातील वाशिंद-पिवळी-कांबारे हा रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग क्र.-57) या दर्जाचा असून एकूण 23.600 कि.मी. लांबीचा आहे. या रस्त्याची हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. या रस्त्यावरील विषयांकित पूल मौजे सावरोली (खु.) येथे कि.मी.4/750 या साखळी क्रमांकावर आहे..

या प्रकरणी दि.16 जून 2025 रोजी सायंकाळी सोशल मीडियावर या पूलास तडे गेल्याने याबाबतची बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानुषंगाने शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तात्काळ प्राथमिक पाहणी करण्यात आली. तद्नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार हा पूल दि.16 जून 2025 रोजी रात्रीपासून हलकी वाहने (Light Vehicle) वगळून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली.

तद्नंतर दि.17 व 18 जून 2025 रोजी या पूलाचे संरचना लेखा परीक्षण करण्यात आले आहे. या रस्त्यावरुन हलक्या वाहनांची वाहतूक करण्यात यावी व सर्व अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून दरम्यानच्या काळात खालील देण्यात आलेल्या रस्त्याचा पयायी मार्ग म्हणून वापर करण्यात यावा.हलकी वाहने वगळून इतर वाहनांना वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग- 1) भिवंडीकडून येणारी वाहने सारमाळ-खानिवली-पच्छापूर-वाडा या मार्गे जातील. 2) शहापूर, मुरबाड कडून येणारी वाहने वाडा-शहापूर ते कर्जत चौक रस्ता (रा.मा. क्र.79) या रस्त्यावरुन शहापूर-पुनधे-आटगांव-तानसा-अघई-कांबारे-वाडा अशा मार्गे जातील. 3) कसारा, नाशिक कडून येणारी वाहने खर्डी परळी उज्जैनी जव्हार सारसून ते राज्य सरहद्दीपर्यंतचा रस्ता (रा.मा.क्र.७७) या रस्त्यावरुन खर्डी-दहिगांव-टेंभा-बेलवड-अघई-कांबारे-वाडा अशा मार्गे जातील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-2. ठाणे कार्यकारी अभियंता एस. एम. कांबळे यांनी कळविले आहे.

000000000000

संबंधित पोस्ट

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण कला-संस्कृती अनुभवण्यासाठी ‘महालक्षमी सरस’ ला आवर्जून भेट द्यावी- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – 2025 लादि. 11 फेब्रुवारी पासून सुरुवात

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

ज्ञान पोस्ट’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta