vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

मुंबई प्रतिनिधी –

महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती कार्य मंत्रालयातर्फे दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर येथील संत रोहिदास जयंती महोत्सव समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार श्री. बाबुरावजी माने, मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री. विलास गोरेगांवकर आणि धारावी तालुका अध्यक्ष श्री. दिलीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील चर्मकार समाजातील एक मोठा गट सायंकाळी ४.०० वाजता धारावीतील *संविधान चौक* या ठिकाणी संघटित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जय रोहिदास, जय शिवराय, जय भीम, जय हिंद अशा घोषणा देत, सविधान चौकात श्री.बाबुरावजी माने साहेब आणि श्री. विलास गोरेगांवकर यांनी समाज बांधवांना कार्यक्रमाची माहिती देऊन जनजागृती करून समाज बांधवांना प्रोत्साहित केले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महासाचिव श्री. गणेश खिलारे, संपर्क प्रमुख शंकर बळी जगन्नाथ खाडे, दिलीप दडस आणि महिला नेतृत्व सौ. आरती राजू माने यांची प्रमुख उपस्थिती होती. संविधान चौकातून सायंकाळी ५.०० वाजता दादर हिंदू कॉलनी राजगृह शेजारील किंग जॉर्ज हायस्कूल या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव – भगिनीसह संत रोहिदास जयंती महोत्सव समितीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाचे धारावी तालुकाध्यक्ष श्री. दिलीप गाडेकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन..

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शना’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा