मुंबई प्रतिनिधी – मुंबईत राजकीय पक्षाचा जोर वाढू लागला असताना वरळीच्या हाय प्रोफाईल उमेदवारांचेही भवितव्य लवकरच समोर येणार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा येथून उमेदवारी अर्ज भरल्यापासून आजपर्यंत प्रचाराचा एकही दिवस खाली न सोडता दिवस रात्र प्रचार सुरू आहे
सुत्रांच्या माहितीनुसार कार्यकर्ते पदाधिकारी आणि विभागातील स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी मदत करत आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी यांचं प्रभुत्व वरळी विधानसभा मध्ये दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार कार्य जोर पकडले आहे तर वरळी मतदारसंघातून आमदार असलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही गल्लोगल्ली विभागात प्रचार सुरू आहे सर्व ताकद लावून विभागातील जनतेला शिवसेना मशाल चिन्हाला निवडून देण्यासाठी प्रचाराला जोर लावलेला आहे उभाटा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही प्रचाराला मोठा जोर लावण्याचे चित्र विभागात दिसत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे दिसत नाही त्यांचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी आपणच विजयी होणार असल्याचे सांगितले आहे तर दुसरे या निवडणुकीमध्ये जरूर पराभव होणार असल्याचे त्यांनी सांगितले या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव निश्चित असल्याचे म्हंटले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकत लावून वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचाराचे काम करत आहे या तिन्ही उमेदवारांची लागलेली तिरंगी लढत असून येथील रहिवासी यांचे भवितव्य ठरवणार आहे ते लवकरच आपल्या सर्वांसमोर जाहीर होणारच आहे वरळी विधानसभाचं आमदार कोण हे आपल्याला लवकरच पहावयास मिळेल