vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत ‘भेदभाव’ रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?

मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत ‘भेदभाव’

रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरु असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

रामदास आठवले बुधवारी दुपारी वांद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रांवर गेले होते. याठिकाणी मतदान केंद्रात मतदान करताना अनेक उमेदवार आणि नेत्यांचे फोटो काढण्यात आले. मात्र, रामदास आठवले मतदान करताना त्यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आतमध्ये सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत परवानगी दिलेला ओळखपत्र पास असणाऱ्या एका फोटोग्राफरला आत सोडावे, अशी वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी एकाही फोटोग्राफर ला आत सोडण्यास मनाई केली. हा रिपब्लिकन पक्षाशी दुजाभाव झाल्याची भावना आठवलेंच्या समर्थकांमध्ये पसरली. या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून रामदास आठवले यांच्या कार्यालयाने वांद्रे विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावरील तैनात पोलिसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबत काही कारवाई करणार का, हे बघावे लागेल.

संबंधित पोस्ट

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ

vishwatmaklokswamivarta

पावसाळी पर्यटनाबाबत पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

गुरव व वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी ठाणे येथे कार्यालय कार्यान्वित.

vishwatmaklokswamivarta

ऑनलाइन गेमींगसंदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला पायबंद बसणार   – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मुंबई समाचार 200 नॉट आऊट’ डॉक्युमेंटरीचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन