vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मतमोजणीच्या तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मतमोजणीच्या तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना

 

जालना, प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी पार पडणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीची प्रक्रियेच्या तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्रांचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. 99-परतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जवाहर नवोदय विद्यालय, अंबा ता. परतुर येथे होणार आहे. तर 100-घनसावंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसावंगी, 101-जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना, 102-बदनापूर कृषि महाविद्यालय बदनापूर आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाची नगर परिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे मतमोजणी होणार आहे.

****

संबंधित पोस्ट

शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..

मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर….

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज घाना इथं रवाना.

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta