vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महायुतीचा हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

महायुतीचा हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

 

मुंबई प्रतिनिधी- भाजपा कार्यालयात विजयाच्या महा जल्लोष सुरू च दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या घवघवीत विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. हा सर्वसामान्य जनतेचा विजय  महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे.

आम्ही सांगितले होते आम्ही अभिमन्यू आहोत आणि चक्रव्ह्यू आम्ही भेदला. विशेष करून मी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्यावर विश्वास ठेवला. लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला गेला होता, त्याला यंदाच्या निवडणुकीत जनतेने उत्तर दिले आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही: राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असे विचारले असता ते म्हणाल की, मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की, निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील,राज्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीचे घवघवीत यश संपादन केलंय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, एक है तो सेफ है मोदी है तो मुमकीन है, अशा पद्धतीचं सूचक ट्विट केलंय. विशेषतः आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला मोठी हार पत्करावी लागली होती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी उचलत राज्यातून पायउतार होण्याचं ठरवलं होतं. परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत जी विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती जबाबदारी अन् तो विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सार्थ ठरवलाय. महाराष्ट्राने जो निकाल दिलाय, त्यावरून देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्यातच नाही तर देशातही भाजपासाठी आता महत्त्वाचे नेते बनले आहेत.

फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे दावेदार : भाजपाने राज्यात विधानसभेच्या 149 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तब्बल 130 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे. या कारणास्तव भाजपाचा स्ट्राइक रेट जवळपास 85 टक्क्यांवर गेलाय. याबाबत बोलताना भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे की, धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है, हा महायुतीचा नारा राज्याच्या जनतेने मान्य केलाय. तसेच राज्यात महायुती 200 चा आकडा पार करेल, असेही दरेकर म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभा आहे. ज्यांच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असं एकंदरीत समीकरण ठरलेलं आहे. या कारणाने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हे देवेंद्र फडणवीस असल्याचंही ते म्हणालेत.शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली :तसेच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनीही या विजयावर प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जे भरघोस मतदान केलंय, त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले यांनी जे काम केलंय. त्यावरून अप्रत्यक्ष लाभाचे राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण महायुती सरकारने केल्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. भाजपा-शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती, ती शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी 2019 ला तोडली. त्याचा एक विशिष्ट राग बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिवंत ठेवलेला आहे असे यावेळी त्यांनी सांगितला आहे

संबंधित पोस्ट

नागपुरात सामूहिक बलात्कार ,11 वर्षीय मुलीवर अनेक वेळा बलात्कार नऊ जणांना अटक, गुन्हा दाखल…..

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले.

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी हत्या प्रकरण- तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta