मुंबईत आतंकवादी हल्ल्याला आज 16 वर्षे पूर्ण,हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस आणि निष्पाप नागरिकांना बळी,सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…
राज्य प्रतिनिधी- पाकिस्तान रचित मुंबईत झालेला क्रूर आतंकवादी हल्ला 26/11 च्या या हल्ल्यास, आज या घटनेला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या आणि निष्पाप नागरिकांच्या बळींच्या स्मृती अनेकांच्या मनात जागृत आहेत. आज सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शहीदांसह निष्पाप बळींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्राप्त माहितीनुसार -पाकिस्तान स्थित भारत विरोधी आतंकवाद्यांनी एक योजनाबद्धरित्या भारतामध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाने गुपचूप रित्या मुंबईवर हल्ला योजना आखली होती या हल्ल्यात करोडो रुपयाचे नुकसानासह निष्पाप नागरिक आणि पोलिसांचे बळी गेले त्या दिवशीची एक आठवण त्याची थोडक्यात माहिती अशी की
[ 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (26/11# 16 वर्ष पूर्ण झाली. परंतु, त्या रात्रीचा तो थरार आठवताच अद्याप मनात काहुर माजते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी लश्कर-ए-तैयबा चे 10 आतंकवाद्यांनी मुंबईवर हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब बॉम्ब हल्ला आणि बेशूट गोळीबार केला. दहशतावद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, द ताज महल पॅलेस, ओबेरॉय-ट्राइडेंट हॉटेल येथे हल्ला करत निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यात 160 हून अधिक लोक मारले गेले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते
[ दरम्यान: पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतलं होतं. याशिवाय अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही हल्ला केला. त्यांच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स रॅपिड अॅक्शन फोर्स , मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो यांना पाचारण करण्यात आलं. परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले. जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.
हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले.दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला
[26/11,मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती . त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती . कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं . खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं.. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. 2012 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशीाबाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने 21 नोव्हेंबरला फाशी देण्याचं निश्चित केलं. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली परंतु या घटनेची वारंवार आठवण या देशातील नागरिकांना होत आहे आतंकवादाचे समूळ उच्चाटन व्हावे असे अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे