vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांचा गौरव

उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांचा गौरव

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : पोलिस आयुक्तालयात बुधवारी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध गुन्ह्यात तसेच निवडणूक बंदोबस्तात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी आणि अमलदार यांना प्रशस्तीपत्र देत गौरवण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांचाही सहभाग होता. यावेळी पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत, प्रशांत स्वामी आदींची उपस्थिती होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधासनसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर प्रचार सभेसाठी आले होते. पतंप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्री महोदय उपस्थितीत होते. पंतप्रधान व इतर महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सुरक्षा शाखा, छत्रपती संभाजीनगर येथुन बंदोबस्त योजना निर्गमित करण्यात आली होती. पंतप्रधान यांचा दौरा कार्यक्रम दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसुन सदरचा बंदोबस्त श्री.ताठे यांच्या अखत्यारिखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. श्री.ताठे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल व भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगीरी करावी म्हणुन छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या वतीने श्री.ताठे यांना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते प्रशंसापत्र देवुन गौरवण्यात आले.

संबंधित पोस्ट

डाक विभागाची सांगलीत 19 डिसेंबरला पेंशन अदालत

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

मुंबईतील  धारावी भागामध्ये  भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या उपस्थितीत   मार्शल आर्ट इंटरनॅशनल स्पोर्ट, अकॅडमी चे उद्घाटन  संपन्न

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन