vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

राज्य प्रतिनिधी परभणी – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते.संविधानानुसार देश चालतो.ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी या देशातून चालते व्हावे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळाची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली.त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची माहिती घेतली

यावेळी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची सर्व चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची ही आरोपीची नार्को चाचणी करण्याची मागणी आहे.संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सुत्रधार आहे ? कुणाचा हात आहे हे शोधण्या साठी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्यांना जमत नसेल तर या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

10 डिसेंबर संविधान अवामनाचा प्रकार परभणीत घडल्या नंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध आंदोलन परभणीत केले.संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही .तुरळक ठिकाणी केवळ 2 गाड्यांच्या काचा आणि काही दुकानाच्या नाम फलकाचे नुकसान झाले आहे.या आंदोलनात विद्यार्थी महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत .ज्या पोलिसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अतीप्रमनात मारहाण केली आहे; वस्तीमधील पार्किंग मधील गड्याफोडल्या आहेत.त्या पोलिसांची ही चौकशी व्हावी.काही समाजकंटक यांनी पोलिसांसोबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

अटक 42 आंदोलक पैकी 10 जणांना जामीन मिळाला आहे पोलीस किंबिंग ऑपरेशन करणार नाहीत निर्दोष व्यक्तींवर गोन्हे दाखल करणार नाहीत असे शांतता कमिटीत ठरले असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.याप्रकरणी आपण दिल्लीत काल मुख्यमंत्री देवेंद भेट घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

संबंधित पोस्ट

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर, बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करत उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप काढणार सावरकर गौरव यात्रा-

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परताअन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक,प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान

vishwatmaklokswamivarta

आई” योजनेच्या प्रचार प्रसिद्धीचे वाहन पर्यटन संचालनालयमार्फत पालखी मार्गावर रवाना*