
आई” योजनेच्या प्रचार प्रसिद्धीचे वाहन पर्यटन संचालनालयमार्फत पालखी मार्गावर रवाना*
सातारा प्रतिनिधी):- पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले पर्यटन विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारे वाहन पालखी मार्गावर रवाना करण्यात आले. त्यावर “आई” योजनेची संपूर्ण माहिती देणारी व्हिडिओ फीत चालविण्यात येत आहे. तसेच पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहन लोणंद फलटण परळ नातेपुते माळशिरस – वेळापूर वंडी- शेगाव- वाखरी- पंढरपूर- मंगळवेढा या मार्गाने प्रचार व प्रसिद्धी करत जाईल सदर वाहन विभागीय कार्यालयापासून रवाना करण्यात आले. त्यावेळी उपसंचालिका शमा पवार व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
या वाहनासोबत “आई” या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता नियुक्त केलेले जिल्हा प्रकल्प अधिकारी स्वत: सहभागी असून ते गावोगावी वाहनासोबत फिरुन राज्यभरातून पालखी मार्गावार येणाऱ्या तसेच, पंढरपूर येथे माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक, वारकरी, शेतकरी बांधवांना पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची संपूर्ण माहिती देतील. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ही योजना सुरु करणेत आली आहे त्यासाठी पर्यटन व्यवसाय हा पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालिका ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. दूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक असून पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत. महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.
महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. सध्यस्थितीत पुणे विभागामध्ये ४८ अर्ज प्राप्त झालेले असून त्यामध्ये अर्जदाराना पात्रता प्रमाणपत्र विभागीय कार्यालयामार्फत देणेत आले आहेत. तरी या क्षेत्रांत व्यवसाय करणाऱ्या किंवा नव्याने व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेणेचे, आवाहन, पर्यटन, संचालानयामार्फत करणेत येत आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक नाशिक कार्यालयात संपर्क साधण्यात यावा, संपर्कासाठी पत्ता उपसंचालक कार्यालय, विभागीय पर्यटन कार्यालय, MTDC Office, आय बरॅक, सेंन्ट्रल बिल्डींग, पुणे.
0000000



