vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

उद्योग सुरु करायचाय? एमआयडीसीत मिळेल जागा*एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात…

उद्योग सुरु करायचाय? एमआयडीसीत मिळेल जागा*एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात…

 

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,: उद्योग सुरु करायचा म्हटले की जागा कुठे मिळणार हा प्रश्न अनेकांसमोर असतो. परिणामी अनेकांच्या स्टार्टअप्स, उद्योग व व्यवसायांच्या संकल्पना अंमलात येत नाहीत. त्यामुळे उद्योग विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत उद्योग व व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी जिल्ह्यातील विविध सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भूखंड आणि व्यापारी भूखंडाचे ॲानलाईन निविदा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे लोणार (लघु) औद्योगिक क्षेत्रात दोन एमएसएमई भूखंड, खामगांव औद्योगिक क्षेत्रात दोन व्यापारी भूखंड, देऊळगाव राजा औद्योगिक क्षेत्रात एक, मलकापूर औद्योगिक क्षेत्रात एक आणि बुलढाणा (लघु) औद्योगिक क्षेत्रात एक व्यापारी भूखंड वाटप करण्यात येणार आहे.

या औद्योगिक क्षेत्रातील वाटपास उपलब्ध असलेले व्यापारी भूखंड” जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” या तत्वावर वाटप करण्यासाठी शुक्रवार दि २० डिसेंबरपासून शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ सायं. ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती व अर्ज https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

या भूखंडांच्या संख्येमध्ये व क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राखून ठेवले आहेत. निविदा प्रक्रियेचा १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ज्या भूखंडांना “दोन पेक्षा कमी” निविदा प्राप्त होतील. त्या भूखंडांचा कालावधी १५ दिवसांकरीता वाढविण्यात येईल. या निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवल्यास +९१८४२२९४४०४३ या तांत्रिक संपर्क क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. तसेच भूखंडाबाबत अधिक माहितीकरीता निविदा कागदपत्रांमधील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.००००

संबंधित पोस्ट

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना-भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर..

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय…ओला दुष्काळ जाहीर करा… अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला…* 

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ७३ वा दीक्षांत समारोह संपन्न महिला विद्यापीठाने वंचित महिलांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचवाव्यात  – राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta

11′ तारखेपासून सुरू होणार पितृ पक्ष, जाणून घ्या याविषयी अधिक

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक