vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना-भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर..

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना-भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर..

 

 

राज्य प्रतिनिधी: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन-२०२४ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) या मधील कामगार / अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर यांनी शासकी य प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

 

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवशी सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

 

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने या सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे श्री. मुजावर यांनी स्पष्ट केले आहे.

 

आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली दूरध्वनी क्रमांक ०२३३-२९५०११९. अथवा ई-मेल आयडी – laboursveep@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातून खळबळ बातमी : भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या, फरार आरोपींचा शोध सुरू

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta