vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत ११ व १२ जानेवारीला फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन…

मुंबईत ११ व १२ जानेवारीला फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन…

( सुरेश गायकवाड )मुंबई- रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीच्यावतीने ‘फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प’चे आयोजन 11 आणि 12 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर फिनिक्स टॉवर्ससमोरील, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे.

या उपक्रमाला जवळ जवळ 16 वर्ष होत आहे . आतापर्यंतच्या शिबिरांमध्ये प्रत्येकी 3 हजारांहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी पत्रकार संघात दिली.  यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे डॉ. अरुणकुमार गुप्ता, ॲड. विनय खंडेलवाल,इत्यादी उपस्थित होते.  या वर्षी शिबिरात पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल, कमलादेवी गौरीदत्त मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट असिस्टन्स असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, कैवल्य धाम यांसारख्या अग्रगण्य वैद्यकीय संस्थांचे डॉक्टर सहभागी होणार आहेत. त्यावेळेस नेत्र, दंत, दमा, ऑर्थोपेडिक,कान नाक घसा, हृदयरोग, कर्करोग, रक्त आणि मधुमेह तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक तपासणी, सल्ला आणि औषधांचे मोफत वाटप, सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करण्यात येणार आहेत . शिवाययोग प्रात्यक्षिके व सल्लामसलत,मोफत ECG तपासणी केली जाणार आहे.   या कार्यक्रमासाठी व्यापक प्रचार केला गेला आहे.75 बॅनर लावण्यात आले आहेत. 22 हजार हँडबिल्सचे वाटप,25 वृत्तपत्रांमध्ये शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करणारे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.    रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 नियामक मंडळाने या उपक्रमाला सर्वोत्कृष्ट सामुदायिक सेवा उपक्रमांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. स्थानिक महानगर पालिका प्रशासन, नगरसेवक, आमदार आणि पोलिस स्टेशनकडून या शिबिराला पाठिंबा मिळाला आहे.अशी माहिती अजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

000000

संबंधित पोस्ट

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

मा उच्च न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत आर आर डुकरेनां सेवा निवृत्ती चा लाभ देऊ नका-प्रशांत डोंगरदिवे मा. उच्च न्यायाल्याने दिले 31 जुलै ला हजर राहण्याचे आदेश

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशासकीय सेवेत घवघवीत यश..