vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदुर बाजार, भातकुली, अमरावती तालुक्यामधील १०५ गावांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन दरडोई ५५ लिटर्स पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

 याबाबत सदस्य राजेश वानखेडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य नारायण कुचे यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

  मंत्री पाटील म्हणाले, या वाढीव पाणीपुरवठा योजनेस २०२१ मध्ये तांत्रिक मंजुरी तर २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कामे संथ गतीने झाल्याने कंत्राटदारास दंड आकारण्यात आला आहे. या योजनेतून सध्या ८१ गावांना दरडोई ४० लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे.

****

संबंधित पोस्ट

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेच्या उपस्थित सतीश घाटगे यांचा भाजपात जाहीर प्रवेश-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

vishwatmaklokswamivarta

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta