vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

 

औरंगाबाद (प्रतिनिधी) लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जवळ जुनाबाजार येथे ४०० फुटाचे केबल टाकलेले आहे. परंतु सदर ठिकाणी रोडवर गड्डूचे काम सुरु आहे.त्यामु‌ळे सदर जागेवरील केबल पूर्णपणे खराब झालेले आहे.ते तात्काळ दुरुस्ती करावे किंवा नवीन केबल टाकण्यात यावे अशी मागणी गब्बर एक्शन कमिटीच्या वतीने

शहर अध्यक्ष शेख इस्माईल राजा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य विद्युत मंडळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.सदरील जागेवरून नागरिकांना जाण्या-जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे.

तसंच येथे नागरिकांना शॉक लागतो तसेच हे काम नाही केले तर एखाद्याचा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच याबाबत वारंवार सिटीचौक येथील संबंधित कार्यालय येथे तोंडी व लेखी तक्रार दिलेली आहे.

परंतु आजपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. या ठिकाणचे काम एकतर पूर्ण झालेले नाही तर याची जबाबदारी विद्युत मंडळावर राहील असेही निवेदनात शेख इस्माईल राजा यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

सीएससी सेंटर चालविण्यास इच्छुक माजी सैनिकांना30 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडणार;बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस