vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायतीची बदनामी करणार्‍याविरूध्द कारवाई करा ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन..

खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायतीची बदनामी करणार्‍याविरूध्द कारवाई करा ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन..

जालना (प्रतिनिधी) ः खोटे आरोप करून प्रशासनाची दिशा भूल करत ग्रामपंचायत अकोली या स्वाइस्त संस्थेची खोट्या तक्रारी करून समाज माध्यमातून ग्रामपंचायतची बदनामी करणार्‍यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक व वैयक्तिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली असून अकोली शिवारामध्ये ग्रामपंचायतीने शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून 13 पांदन रस्त्यापैकी 12 पांदन रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. तसेच एक रस्ता जो बाकी आहे त्या रस्त्याचे तक्रारदार सिद्धेश्वर सोळंके यांनीच काम आडवलेले आहे. सदर रस्त्याचे कामे ही दर्जेदार झाले असून शेतकर्‍यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर शेतकर्‍याला शेतातील माल वाहतुकीसाठी कुठलीही अडचण राहिलेली नाही. अकोली ग्रामपंचायतीने डिजिटल अंगणवाडी बांधकाम, प्रशस्त प्ले ग्राऊंड, दर्जेदार सीमेंट रस्ते, स्मशानभूमी बांधकाम भूमिगत गटार, अश्या प्रकारच्या ग्रामपंचायत ने उत्कृष्ट दर्जेची कामे केली आहेत. याची पाहणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी पाहणी करून सर्व कामाची प्रशंसा केली आहे. अशी कामे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करावीत असे आव्हान त्यांनी अकोली या गावातून प्रसार माध्यमातून केलेली आहे. त्याचबरोबर मागेल त्याला सिंचन विहीर, शेततळे, जिल्ह्यात मजुरांना सर्वात जास्त काम देणारी ग्रामपंचायत अकोली ग्रामपंचायत आहे. या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे अकोली या गावाने गावातील प्रत्येक कुटुंबाला अहिल्यादेवी सिंचन विहीर, शेततळे देण्याचे काम केले आहे. त्यामुळे गावातील सिंचन विहीर लाभार्थ्यांचे उत्पन्न हे दुपटी पेक्ष्याही जास्त वाढलेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दुसर्‍यांच्या शेताता काम करण्यासाठी जाण्याची गरज भासत नाही. मात्र, अकोली या ग्रामपंचायतीने वैयक्तिक लाभामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, अहिल्यादेवी घरकुल योजना या मध्ये सर्वात उत्कृष्ट काम केले आहेत. सर्व कामे पाहून व राजकीय द्वेष्यापोटी गावातील काही मंडळी ज्यांना विकास बगवत नाही अश्या गावद्रोही तक्रारदराने वारंवार खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये 10 एप्रिल 2023 रोजी अश्याच खोट्या तक्रारी देऊन अर्ज केला होता. त्याची चौकशी होऊन सर्व कामे उत्कृष्ट दर्जेची झालेली आहेत असा अहवाल गट विकास अधिकारी पंचायत समिती, परतूर यांनी चौकशी करून दि. 5 जून 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला आहे. त्या अहवालाची प्रत व कामाचे जिओ टॅगिंगचे फोटो देखील होते. स्वतः चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी खोट्या तक्रारी देऊन उपोषणाला बसलेले आहेत. चोराच्या उलट्या बोंबा या म्हणी प्रमाणे कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्यांनी केले आहे. त्यांनीच स्वतःच्या बुडाखालील अंधार लपवण्यासाठी हा खोटा पराक्रम केला असून सिद्धेश्वर सोळंके यांचे वडील पांडुरंग सोळंके हे तात्कालीन जिल्हा परिषद सदस्य असतांना लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या अकोली गावातील पाझर तलाव क्र. 03 साठी महाराष्ट्र सरकारने संपादित केलेल्या 3 हेक्टर व 95 आर जमिनीवर खोटे-नाटे कागदपत्र कोर्टात सादर करून अतिरिक्त मावेजा मिळवला आहे. आज रोजी पाझर तलावाची भिंत फोडून सर्व जमीन कसत आहे. यांच्या सर्व तक्रारी प्रशासनाला झाल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी अश्या खोट्या तक्रारी अर्जदार सिद्धेश्वर सोळंके व गावातील गैरकायद्याचे मंडळी यांना हाताखाली धरून वेळोवेळी तक्रारी करत आहे. या पूर्वी त्याच्या गैरकायद्याचे मंडळी हाताशी धरून त्यांनी बर्‍याच तक्रारी केल्या होत्या त्या सर्व कामाची प्रशासना मार्फत चौकशी होऊन अहवाल शासन दरबारी उपलब्ध आहे. खोट्या तक्रारी करणार्‍यावर व ग्रामपंचायतची बदनामी करणार्‍यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे.

निवेदनावर रामेश्‍वर खुळे, सौ. पल्लवी सोळंके, सौ. कावेरा सोळंके, आकाश मोरे, सौ. गवळण गाते आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित पोस्ट

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

vishwatmaklokswamivarta

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…