vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 20 मार्च रोजी-मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 20 मार्च रोजी-मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी:- राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत व जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुरक्षा केंद्र कार्यरत असून, त्यामार्फत एचआयव्ही/एड्स संवेदनशीलता व जागरुकता कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये जिवित हक्क, वर्तन समस्येतून मुक्तीविषयक समुपदेशन, त्यावरील उपाय, संवध व्यवस्थापन यावर कार्य केले जाते. संपूर्ण सुरक्षा केंद्रांतर्गत दि.20 मार्च 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय, बदलापूर येथे सकाळी 9 वाजता मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या रक्त चाचण्या तसेच गुप्तरोग व क्षयरोगविषयी माहिती व तपासणी, मधुमेह तपासणी, दंत तपासणी, कान/नाक/घसा तपासणी, ईसीजी, आयुर्वेदिक सेवा, आभा कार्ड, इतर सुविधा तसेच विविध वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहेत.

तरी, या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद१,६९९ लसीकरण बूथवर १ लाख १७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती

vishwatmaklokswamivarta

अवयवदान मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श- जिल्हाधिकारी अशोक काकडेसांगली जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला..

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे