vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

ठाणे, प्रतिनिधी:- वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे निर्यात योग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने उत्पादन घेता येते. त्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

लाभाच्या योजना:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान· राष्ट्रीय कृषी विकास योजनाखर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा व क्षेत्र मर्यादा:-बाब – हरितगृह (OVPH), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.1000 ते 1200. अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 6.0 लाख, 10 गुंठे – 10.58 लाख, 20 गुंठे – 20.80 लाख, 25 गुंठे – 25.00 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 3.0 लाख, 10 गुंठे – 5.38 लाख, 20 गुंठे – 10.40 लाख, 25 गुंठे – 12.50 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – हरितगृह (CCPH), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.1500 ते 1800. अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 9.0 लाख, 10 गुंठे – 16.12 लाख, 20 गुंठे – 31.20 लाख, 25 गुंठे – 37.50 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 4.50 लाख, 10गुंठे – 8.06 लाख, 20 गुंठे – 15.60 लाख, 25 गुंठे – 18.75 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – शेडनेटगृह, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.710, अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 3.55 लाख, 10 गुंठे – 7.18 लाख, 20 गुंठे – 14.76 लाख, 25 गुंठे -17.75 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 1.77 लाख, 10 गुंठे – 3.59 लाख, 20 गुंठे – 7.38 लाख, 25 गुंठे – 8.87 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – प्लास्टिक मल्चिंग, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.4.0. अपेक्षित खर्च – 40000 प्रति हेक्टर. 50% देय अनुदान – 20000 प्रति हेक्टर. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 2 हेक्टर.

नव्याने समाविष्ट घटक:-बाब – फळ पिकांकरिता फळांना/फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.5. अपेक्षित खर्च – रु.50000/. 50% देय अनुदान – रु. 25000/. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 2 हेक्टर.बाब – तण नियंत्रक अच्छादन (Weed Mat), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड -रु.50.00. अपेक्षित खर्च – रु. 200000/ एकर. 50% देय अनुदान – 100000/एकर. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 4000 चौ.मी.

बाब – हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.350. अपेक्षित खर्च – रु.350000/10 गुंठे. 50% देय अनुदान – रु.175000/ 10 गुंठे. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 1000 चौ.मी.

अनुसुचित क्षेत्रासाठी 15 टक्के अतिरिक्त खर्चाचा मापदंड देय आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ अथवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 उतारा, 8-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा ही कागदपत्रे आवश्यक आहेत, असे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि ओषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी.मोते यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल नक्षलोत्तर परिवर्तनासंदर्भातील राज्यस्तरीय आढावा बैठक

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपिता यांचा सत्कार