vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? – संदीप देशपांडे, सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? – संदीप देशपांडे, सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना….

प्रतिनिधी,मुंबई: मागच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट केला होता. मुंबईत आखून दिलेल्या वेळेपेक्षा, दुकानं जास्तवेळ सुरु ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. आज त्यांनी व्हिडिओ संबंधी स्पष्टीकरण दिलं आहे.

सध्या घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. मनसे या व्यापाऱ्यांसोबत कायम आहे. त्यातच काही वसुली करणाऱ्यांमुळे हे व्यापारी त्रस्त झाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी आंदोलने केली” असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. “मला चौकशीला बोलवावं वसुली करत आहेत, यासंदर्भात मी माहिती नक्कीच देईन” असं देखील संदीप देशपांडे म्हणाले.”व्हिडिओ हा व्यापाऱ्यांच्या विरोधात नव्हता. आठ वाजेपर्यंत त्यांना अधिकृत पद्धतीने दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. शनिवार-रविवारी दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी” अशी मागणी संदीप देशपांडेंनी केलीय. “तिकडे व्यापारच बुडाला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना व्यापार करता यावा, यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला होता. व्यापाऱ्यांवर अन्याय होतोय,

त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी रहाणार” असं संदीप देशपांडे म्हणाले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला आमदार एकनाथ शिंदे यांचे उत्तर…

मुंबईतील दुर्घटना : ‘बीकेसी’मधील निर्माणाधीन पूल कोसळला; 13 मजूर जखमी,पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली

vishwatmaklokswamivarta

नाशिक मध्ये खाजगी बसला भीषण आग, दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मदत जाहीर

सर्वसामान्यांना दिलासा, केंद्र सरकार कडून इंधनदरात कपातीच्या घोषणेनंतर पहा आजचा पेट्रोल, डिझेलचा दर काय?

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्यावतीने सदनिका संगणकीय सोडत..

एन्काऊंटर स्पेशलिस्ट  प्रदीप शर्मा यांना ‘एनआयए’कडून अटक….

vishwatmaklokswamivarta