vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ..

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ..

जालना, प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी एनएसजी करणार सायक्लोथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचे जतन  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,नागठाणेच्या बालगंधर्व स्मारक कामाची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध