
जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर
सांगली, द प्रतिनिधी : जागृती योजनेंतर्गत कायदेविषयक शिबीराचे आयोजन शुक्रवार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट तळागाळातील सर्व स्तरावरील गरजू लोकांना मोफत विधी सेवा मिळणे व कायदेविषयक ज्ञान मिळणे हे असून याचा लाभ सर्व गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तथा सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, तालुका विधी सेवा समिती मिरज, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक, महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
000000



