vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

मुंबई, प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिका / इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील टपाल मतपत्रिका यांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी ह्या आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेतील दोन प्रमुख टप्पे आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होते, तर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएमची मोजणी सुरू होते. पूर्वीच्या निर्देशांनुसार, ईव्हीएमची मोजणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीपासून स्वतंत्रपणे सुरू राहू शकत होती, त्यामुळे काहीवेळा ईव्हीएमची मोजणी टपाल मतपत्रिकांपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत असे.

अलीकडेच दिव्यांग मतदार व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत सुसंगती आणि स्पष्टता राखण्यासाठी ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या मोजणीतील शेवटून दुसरी फेरी टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

याशिवाय, ज्या मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या मोठी आहे, तिथे पुरेशा संख्येने टेबल्स आणि मोजणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत, जेणेकरून मतमोजणीची गती आणि पारदर्शकता कायम राहील, असे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

000

संबंधित पोस्ट

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

आर्मेनियातील भारतीय दूतावास, टोवमास्यान फाउंडेशन आणि लुईसयोगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayOfYoga2026 निमित्त १०८ सूर्यनमस्कारांच्या प्रेरणादायी सत्राचे आयोजन

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta