vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यानुसार विभागीय हातमाग कापड स्पर्धा नागपुरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे.

अमरावती आणि नागपुर विभागातील सर्व जिल्ह्यातील हातमाग विणकरांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याकरीता हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. विणकरांनी आपले नमूने प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपुर प्रशासकीय इमारत क्रमाक 2, आठवा माळा, “बि” विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्याशी किंवा 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त तथा विभागीय हातमाग कापड स्पर्धा सदस्य सचिव सीमा पांडे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश जून २०२६ पर्यंत क्रेडिट डेटा अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta