vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात उद्या मंगळवारी त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन

जालन्यात उद्या मंगळवारी त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन

जालना /प्रतिनिधी-जेईएस महाविद्यालय, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेच्यावतीने जालना येथील जेईएस महाविद्यालयाच्या सांकृतिक सभागृहात उद्या मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडीया हे तर उद्घाटक म्हणून छ. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठता प्राचार्य डॉ.मजहर फारुकी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जालना एज्युकेशन सोसाटीचे सचिव श्रीनिवास भक्कड, डॉ. अब्दुल माजेद, डॉ. अर्पणा पाटील यांची उपस्थिती राहणार असून यावेळी मुशयाराच्या अध्यक्षस्थानी छ. संभाजीनगर येथील हिंदी गझलकार डॉ. इकबाल मिन्ने हे राहणार असून यावेळी डॉे. गणेश अग्नीहोत्री, धाराशिवचे मराठी गझलकार राजेंद्र अत्रे, लातूरचे हिंदी गझलकार योगीराज माने, मराठी गझलकार युवराज नळे, जमाल चिस्ती (छ.संभाजीनगर), भागवत घेवारे (धााराशिव), सुनिता कपाळे (छ.संभाजीनगर) हे यावेळी मुशयारामध्ये सहभाग नोंदवतील.

तरी या कार्यक्रमास जालना तसेच परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. सत्यशिला तौर आदींनी केले आहे.

संबंधित पोस्ट

प्रोजेक्ट महादेवा ठाणे जिल्हा निवड चाचण्या; प्रचंड उत्साह आणि फुटबॉल प्रतिभेचा आविष्कार*

vishwatmaklokswamivarta

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

नवी मुंबई पोलिसांच्या ASI पी. एन. पाटील यांनी लॉजच्या खोलीत आत्महत्या केली; 8 पानांच्या सुसाईड नोट आणि मोबाईल व्हिडिओमध्ये मृत्यूच्या कारणांचा उल्लेख वरिष्ठ अधिकारी छळवणूक करत असल्याचा आरोप

vishwatmaklokswamivarta

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला