vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नवी मुंबई-आरोग्य विभाग हिवताप / डेंग्यु शिबिरांचे प्रभावी नियोजन

नवी मुंबई-आरोग्य विभाग हिवताप / डेंग्यु शिबिरांचे प्रभावी नियोजन

नवी मुंबई प्रतिनिधी -आरोग्य विभाग हिवताप / डेंग्यु शिबिरांचे प्रभावी नियोजन   हिवताप / डेंग्‍यु सारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे करुन घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते, यामुळे नागरीकांमध्ये जनजागृती करुन सक्रीय सहभाग घेण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातीत विशेष प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 10-7-2025 रोजी जाहिर शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरांकरीता एकुण 11312 नागरीकांनी भेट दिली असुन त्यांना हिवताप डेंगी आजार पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या व डासउत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिका दाखवण्यात आले

हिवताप / डेंग्युची आकडेवारी v सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये हिवताप व डेंगी रुग्णसंख्या खालील प्रमाणे आहे. कालवधी – 1 जानेवारी 2025 ते 06 जुलै 2025 · घेतलेले रक्तनमुने – 87789· हिवताप दुषित रुग्ण – 18 · संशयीत डेंग्यु – 194 एन आय व्ही पुणे/सीव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल – 7 · दुषित डेंग्यु रुग्ण – 2 v जाहिर शिबीरांची आकडेवाडी-.अ.क्र दिनांक शिबीरांची संख्या भेट दिलेल्या नागरीकांची संख्या घेतलेले रक्तनमुने

1. 25/4/2025 26 4740 0 2. 16/5/2025 26 7455 884

3. 22/5/2025 26 10021 647 -4. 30/5/2025 26 11040 783 / -5. 5/6/2025 26 11736 864

6. 12//2025 26 11363 767 -7. 19/6/2025 26 110742025- 8. 26/6/2025 26 11456 749 -9. 2/7/2025 26 11536 688-10. 3/7/2025 26 11154 622    11. 10/07/2025 26 11312 624     एकुण 286 112887 6666-

स्वच्छता व आरोग्य हे एकमेकांशी सुसंगत आहे, यामुळे आपण आपली वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छ ठेवला तर नवी मुंबईत साथरोग, हिवताप व डेंग्यू आजारावर आळा घालणे सहज शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.“घरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करु, मलेरिया / डेंग्यू आजारावर मात करु”

संबंधित पोस्ट

डास प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकालीन विशेष धुरीकरण मोहिमेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वारसा आणि उत्तम आरोग्याचा कानमंत्र*🌹

vishwatmaklokswamivarta

आयोडीनयुक्त मीठ, सैंधव/काळे मीठ*प्रथम आपण ह्या विविध मीठांचे गुण पाहू.

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये रुग्ण तपासणी…

लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.