vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; नियंत्रित क्षेत्रे घोषित, मनाई आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; नियंत्रित क्षेत्रे घोषित, मनाई आदेश लागू

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील देऊळगाव, मलकापुर, सिंदखेड राजा, खामगाव व चिखली तालुक्याच्या गावांमधील जनावरांत लम्पी त्वचाआजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे येथील पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सहआयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यानुसार या तालुक्यातील गावे नियंत्रित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून, या क्षेत्रातील गुरांचे बाजार, वाहतूक व इतर बाबींसंदर्भात मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केला आहे.

 बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळगव्हाण सिंगव, जहागीर, पांगरी, अंढेरा, मलकापूर तालुक्यातील मलकापूर शहर, सिंदखेड राजा तालुक्यातील दरेगाव, साखर खेर्डा, उमनगाव, पांगरी काटे, खामगाव तालुक्यातील शीर्ला नेमाने तसेच चिखली येथील केळवद येथील जनावरांत लम्पी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

नियंत्रित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. गुरे, म्हशी प्रजातीचे प्राणी अन्यत्र किंवा नियंत्रित क्षेत्राबाहेर नेण्या-आणण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वैरण, साहित्य, कातडी, प्राण्यापासूनचे अन्य उत्पादन नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास मनाई घालण्यात आली आहे.

नियंत्रित क्षेत्रात गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यांना मनाई आहे. परिसरात किटक निर्मूलनासाठी स्वच्छता, फवारणीचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. बाधित जनावर मृत झाल्यास पशुवैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. निरोगी जनावरांना बाधा होऊ नये म्हणून ती वेगळी ठेवावीत. पशुंना आवश्यकतेनुसार प्रतिजैविके द्यावीत. बाधित क्षेत्राच्या ५ किमी अंतरातील गो व महिषवर्गीय पशुंना गॉट पॉक्स लस द्यावी, आदी आदेश देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत, किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

00000

 

वृत्त क्रमांक :626

संबंधित पोस्ट

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये रुग्ण तपासणी…

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते100 क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

vishwatmaklokswamivarta

पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद – ३३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागी

vishwatmaklokswamivarta

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग घेण्याकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन*

विशेष लेख-डेंग्यु:नियंत्रण व उपाययोजना