vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दीपोत्सव’ महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो

दीपोत्सव’ महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो

मुंबई, प्रतिनिधी: दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर आशा, उत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. या तेजोमय पर्वातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी एकजुटीने काम करूया. राज्याच्या सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून या दिशेने आम्ही अथक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बळीराजा संकटात असताना त्यांची दिवाळी कडू होणार नाही याची पूर्ण काळजी शासनाने घेतली आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने प्राधान्याने केले आहे. ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो आणि त्यांचे दुःख, संकटे दूर होवोत,” अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत ते म्हणाले, “शेतकरी असो वा कर्मचारी, समाजातील प्रत्येक घटकाला आनंदात ठेवणे शासनाचे उद्दिष्ट आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण !

vishwatmaklokswamivarta

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta