vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर …

नवी दिल्ली प्रतिनिधी-लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे.

नव्या विधेयकाचा मुख्य उद्देश चार प्राधान्य क्षेत्रांद्वारे रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. या अंतर्गत पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामं आणि हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी विशेष कामांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या कामाची हमी देण्यात येणार असून, अधिक वेतन, संरक्षण आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक